शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी चे आव्हान ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:01 IST

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आहे. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जिल्ह्यात आतापासूनच घुमू लागले आहेत. जिल्ह्यावरील सेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण अशा तीन जागांवर विजय मिळाला होता. दापोली व गुहागर या दोन्ही मतदारसंघांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने कब्जा केला होता. दापोलीची जागा सेनानेते अनंत गीते व रामदास कदम यांच्यातील राजकीय हेवे-दाव्यांमुळे सेनेच्या हातून गेल्यावेळी निसटली. तेथे राष्टÑवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली. रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत , चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांनी सेनेचे गड त्यावेळी राखले.विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा सेनेच्या विजयासाठी एकमेकांचे विरोधक असलेले गीते-रामदास कदम एकत्र आले आहेत. उत्तर रत्नागिरीत त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रत्नागिरी व लांजा - राजापूर हे मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आधी समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी राजापूरची विधानसभा जागा धोक्यात येईल, हे लक्षात आल्याने यु टर्न घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प लादल्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा यु टर्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित कालावधीसाठी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.दुसरीकडे गुहागर व दापोली हे मतदारसंघ राखण्याबरोबरच चिपळूण मतदारसंघही ताब्यात घेण्याचा चंग राष्टÑवादी कॉँग्रेसने बांधला आहे. रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात सेनेची वीण घट्ट बांधली आहे. तरीही येथे भाजपकडून प्रसाद लाड किंवा अन्य तगडा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे राजकारण रंगले आहे.भाजपच्या रणनीतीवर लक्षजिल्ह्यात भाजप कमकुवत असला तरी राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजप नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच २०१९ची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.